yorocks
आभाळाशी नाते माझे दर्याकडयांची ओढ मला.. मस्त कलंदर.. धरती, अंबर.. सांधायचा छंद मला.. वाटेवरची हिरवळ देते नाविन्याचा श्वास मला.. मरगळ जाते.. उर्मी येते.. भटकंतीची आस मला.. असता थोडी वाट वाकडी डोंगर देतो हात मला.. धुक्यात रस्ता.. मनात असता.. निसर्ग देतो साथ मला.. निघतो मी मग नव्या दमाने नव्या जगाचा शोध मला.. आभाळाशी नाते माझे दर्याकडयांची ओढ मला !!!!